Pune News : इतर मुलासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून प्रियकराकडून हॉटेलमध्येच प्रेयसीला मारहाण

एमपीसी न्यूज : आपल्या प्रेयसीचे इतर मुलासोबत ही प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून प्रियकराने हॉटेलमध्ये भेटण्यासाठी आलेल्या प्रेयसीला कमरेच्या बेल्टने बेदम मारहाण केली. उत्तम नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हॉटेल साहिलमध्ये सात सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला. 

सुशांत नारायण काबदले (वय 30) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रियकराची नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. 30 वर्षीय प्रेयसीने याप्रकरणी तक्रार दिली आहे. उत्तम नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की आरोपी आणि फिर्यादी यांच्यात प्रेमसंबंध आहेत. 7 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हे दोघेही कुडजे येथील साहिल हॉटेलमध्ये भेटले होते. यावेळी सुशांत याने प्रेयसीवर तुझे माझ्याशिवाय इतर मुलांबरोबर प्रेम संबंध आहेत असाच संशय घेतला आणि हाताने तोंडावर डोक्यात मारहाण केली. कमरेच्या बेल्टने देखील त्याने तिच्या पाठीवर मारहाण करून जखमी केले आहेत.

उत्तम नगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.