Pimpri : बंदूकीने पत्नीच्या डोक्यावर मारहाण

एमपीसी न्यूज  – ‘महिलेशी का बोलता, अशी विचारणा केल्याने पतीने पत्नीच्या डोक्यात बंदुकीने मारहाण केली. पिंपरी – संत तुकारामनगर येथील गोल मार्केटजवळ गुरुवारी (दि.८) रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली.

प्रमोद छगनराव घाडगे (रा. महेशनगर, पिंपरी) आणि पूजा प्रकाश वायचळ (रा. अ‍ॅटलस कॉलनी, महेशनगर) या दोघांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती एका महिलेशी बोलत असल्याचे घाडगे यांच्या पत्नीने पाहिले. त्यावेळी तिने पतीला तुम्ही महिलेबरोबर का बोलता, अशी विचारणा केली. त्यामुळे चिडलेल्या घाडगे याने त्याच्याजवळील बंदुकीच्या लाकडी मुठीने पत्नीच्या डोक्यावर मारहाण केली, असे पोलिसांनी सांगितले. फौजदार जाधव तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.