Nigdi : सोसायटीच्या पार्किंगमधून गाडी काढण्यास सांगितल्याने वृद्ध नागरिकाला मारहाण; वृद्धाच्या हाताला चावा घेऊन तरुण फरार

Beating of an elderly citizen for asking to remove a vehicle from the Society's parking lot; young man escaped by biting old man's hand.

एमपीसी न्यूज – सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी काढण्यास सांगितल्यावरून एका तरुणाने वृद्ध नागरिकाला मारहाण केली. त्यानंतर वृद्ध नागरिकाच्या हाताला चावा घेऊन पळून गेला. ही घटना मंगळवारी (दि. 28) रात्री सव्वा दहा वाजता भागीरथी बिल्डींग, श्रीकृष्ण नगर, आकुर्डी येथे घडली.

नंदकुमार बाबुराव मंगरूळकर (वय 62, रा. भागीरथी बिल्डींग, श्रीकृष्ण नगर, आकुर्डी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रवीण उर्फ सोनू घ्यार (वय 25) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री आरोपी प्रवीण याने त्याची कारीज्मा दुचाकी फिर्यादी यांच्या पार्किंगमध्ये लावली होती.

_MPC_DIR_MPU_II

त्यामुळे प्रवीणला त्याची दुचाकी पार्किंगमधून काढण्यास फिर्यादी यांनी सांगितले. याचा प्रवीणला राग आला.

त्याने फिर्यादी यांना हाताने मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी यांच्या हाताच्या तळव्याला चावा घेतला. यामुळे फिर्यादी यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली.

त्यानंतर आरोपी प्रवीण पळून गेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.