Wakad : भांडणे करू नका म्हटल्याने एकाला सिमेंटच्या गट्टूने मारहाण

एमपीसी न्यूज – हॉटेलमध्ये जेवणासाठी गेल्यावर तिथे शेजारच्या टेबलवरील तिघेजण हॉटेलच्या व्यवस्थापकासोबत भांडण करत होते. तिघांनी त्यांच्या चौथ्या साथीदाराला बोलावून घेतले. त्यामुळे हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या एकाने चौघांना भांडणे करू नका असे म्हटले, यावरून चार जणांनी मिळून त्यांना सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 1) दुपारी पाच वाजता काळेवाडी फाटा येथील शिवरत्न रेस्टॉरंट येथे घडली.

हरिश्चंद्र श्रीहरी ताटे (वय 39, रा. रहाटणी) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बाळू बंडगर (पूर्ण नाव माहिती नाही, रा. रहाटणी) आणि त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ताटे त्यांच्या मित्रासोबत रविवारी दुपारी पाच वाजता काळेवाडी फाटा येथील शिवरत्न रेस्टॉरंट मध्ये जेवणासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या टेबलशेजारी बसलेले तिघेजण हॉटेलच्या व्यवस्थापकाला भांडत होते. तिघांनी हॉटेलच्या व्यवस्थापकाला हाताने मारहाण केली. त्यानंतर तिघांनी त्यांच्या चौथ्या साथीदाराला बोलावून घेतले.

फिर्यादी ताटे यांनी आरोपींना ‘तुम्ही भांडणे का करता, भांडणे करू नका’ असे समजावून सांगितले. त्याचा राग आल्याने आरोपींनी ताटे यांच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारला. यामध्ये ताटे गंभीर जखमी झाले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like