Dapodi : मोबाईल क्रमांक कशासाठी पाहिजे, अशी विचारणा केल्याने मारहाण

एमपीसी न्यूज – मोबाईल क्रमांक कशासाठी पाहिजे, अशी विचारणा केल्याने एकाने तरूणाला बेदम मारहाण केली. यात तरूणाच्या नाकाला गंभीर दुखापत झाली. ही घटना दापोडी येथे घडली.

अमीर आलम अब्दुल गफुर उस्मानी (वय 22, रा. पवार वस्ती, दापोडी) याने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चाँद (वय 24 ) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. 28 नोव्हेंबर रोजी अमीर हा त्याच्या घराशेजारी मोबाईलवर बोलत होता. यावेळी परिसरात राहणारा चाँद त्याच्याजवळ आला आणि अमीरकडे त्याने मोबाईल क्रमांक मागितला.

त्यावर अमीरने त्याला मोबाईल क्रमांक कशासाठी पाहिजे, अशी विचारणा केली. याचा राग आल्याने चाँदने त्याला शिवीगाळ करत मारहाण केली. यात अमीरच्या नाकाला दुखापत झाली. फौजदार शिखरे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.