Metro News: मेट्रो मार्गिकेवरील रस्ता दुभाजकांचे सुशोभीकरण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक आणि RTO स्थानक ते रामवाडी स्थानक हे मार्ग उन्नत असून ते रस्त्याच्या मधोमध खांब उभारून बांधण्यात आले आहेत. मेट्रोची कामे सुरु असल्याने या दुभाजकांचे सुशोभीकरण करण्यात आले नव्हते. नुकतेच मेट्रोच्या उन्नत मार्गाचे काम जवळपास पूर्ण झाल्यामुळे या दुभाजकांच्या सुशोभीकरणाचे काम मेट्रोने हाती घेतले आहे.

पुणे मेट्रोचे पिंपरी-चिंचवड महापालिका स्थानक ते स्वारगेट स्थानक आणि वनाझ स्थानक ते रामवाडी स्थानक असे 33 किमी लांबीचे 2 मार्ग आहेत. यात 25 किमी उन्नत मगर असून हा मार्ग रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या दुभाजकांमध्ये उभारण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका स्थानक ते खडकी, वनाझ स्थानक ते गरवारे स्थानक, पिंपरी-चिंचवड महापालिका स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक आणि RTO स्थानक ते रामवाडी स्थानक हे मार्ग उन्नत असून ते रस्त्याच्या मधोमध खांब उभारून बांधण्यात आले आहेत. मेट्रोची कामे सुरु असल्याने या दुभाजकांचे सुशोभीकरण करण्यात आले नव्हते. नुकतेच मेट्रोच्या उन्नत मार्गाचे काम जवळपास पूर्ण झाल्यामुळे या दुभाजकांच्या सुशोभीकरणाचे काम मेट्रोने हाती घेतले आहे.

Navale Bridge Accident : नवले पूल अपघातानंतर प्रशासनाला जाग, मार्गावर राबवणार विविध उपाययोजना

मेट्रोच्या 2 खांबामधील अंतर साधारणतः 25 ते 30 मीटर असून त्याची रुंदी 2 ते 2.25 मीटर आहे. पुणे महापालिकेने जागोजागी रस्त्यांच्या दुभाजकांमध्ये झुडूप लावून त्यांचे सुशोभीकरण केले आहे. त्याच धर्तीवर रस्ते दुभाजकांमध्ये चांगली माती टाकून झाडे लावून त्यांचे सुशोभीकरण करण्याचे नियोजित करण्यात आले आहे. हे सुशोभीकरणाचे काम करताना मेट्रोवर कोणताही आर्थिक बोजा पडू नये म्हणून वाहतूक बेटांच्या (ट्राफिक आयलँड) धर्तीवर सुशोभीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी मेट्रोने निविदा काढल्या होत्या.

वनाझ स्थानक ते गरवारे स्थानक येथील निविदा मान्य करून त्याचा कार्यादेश एका कंपनीला देण्यात आला आहे. दुभाजकांच्या सुशोभीकरणाबरोबरच तेथे 2 जाहिरात फलक लावण्याची मुभा त्या कंपनीला देण्यात आली आहे. त्यामुळे मेट्रोला प्रवासी वाहतुकीव्यतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे. याव्यतिरिक्त त्या कंपनीला शहराच्या महत्वाच्या ठिकाणी चौकांमध्ये मेट्रो खांबावर व्हर्टिकल गार्डन करण्यास सांगण्यात आले आहे. दुभाजकांमधील झाडे, लॉन व व्हर्टिकल गार्डन याची देखभाल कंपनीला 5 वर्षेपर्यंत करावयाची आहे. अश्या प्रकारच्या नियोजनामुळे दुभाजक/रस्ता सुशोभीकरणाबरोबरच मेट्रोला नॉन फेअर बॉक्स उत्पन्नदेखील मिळणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थानक ते हॅरिस पूल आणि सिव्हिल कोर्ट स्थानक ते रामवाडी स्थानक या भागातील निविदा प्रक्रिया सध्या सुरु आहे. लवकरच या मार्गिकांच्या सुशोभीकरणासाठी निविदा मंजूर करण्यात येऊन तसा कार्यादेश देण्यात येईल. याप्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी म्हटले आहे की, पुणे शहरात मोठ्या प्रमाणात झाडे आहेत आणि पुण्याचा बराचसा भाग दाट झाडीने व्यापला आहे. त्याला सुसंगत म्हणून मेट्रोने सुशोभीकरणाच्या कार्य हाती घेतले आहे. यामुळे शहराच्या सुशोभीकरणात भरच पडणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.