Pune Festival : कलमाडींनी निमंत्रण दिलं तेव्हा मुख्यमंत्री होतो, इथं येईपर्यंत उपमुख्यमंत्री झालो – देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज – पुण्याची वैभवशाली परंपरा असलेल्या पुणे फेस्टिवलचे शुक्रवारी सायंकाळी उद्घाटन झालं.या उद्घाटन सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हेमा मालिनी, खासदार गिरीश बापट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार फटकेबाजी केली.या कार्यक्रमासाठी सुरेश कलमाडी यांनी मला ज्यावेळी निमंत्रण दिलं त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो.परंतु या कार्यक्रमात येईपर्यंत उपमुख्यमंत्री झालो. आता इथून निघेपर्यंत आमदार होऊ शकतो, ती रिस्क कोण घेईल असे म्हणत फडणवीस यांनी टोलेबाजी केली. 

यावेळी फडणवीस म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना कलमाडी यांनी मला या कार्यक्रमाचे निमंत्रण दिलं होतं.परंतु इथे येईपर्यंत मी उपमुख्यमंत्री झालो.त्यामुळे या ठिकाणी बोलण्यापूर्वीच मी आधी बोलून जाण्याची परवानगी घेतली आहे.नाहीतर इथून जाईपर्यंत उपमुख्यमंत्र्यांचा मंत्री आणि मंत्र्याचा आमदार झालो तर कोण रिस्क घेईल अशी मिश्किल टिप्पणी फडणवीस यांनी केली. फडणवीस म्हणाले, राजकारणातील एक बायोडाटा असतो त्यात पुणे फेस्टिवल नसतं तर माझा बायोडाटा अर्धवट राहिला असता.त्यामुळे माझा बायोडाटा पूर्ण केल्याबद्दल कलमाडीचे आभार मानतो.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, 34 वर्षांपूर्वी आभासी मंच नव्हता त्यावेळी सुरेश कलमाडी यांच्या टीमने कलाकृती सादर करण्यासाठी मंच उपस्थित करून दिला हे काम 34 वर्षांपूर्वी पुणे फेस्टिवलने केले आहे. पुणे फेस्टिवलमध्ये ज्यांचा गौरव होतो ते खूप पुढे जातात, असेही फडणवीस म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.