Sangvi : बिअर शॉपी मध्ये चोरी करणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – बिअर शॉपीच्या दुकानाचे शटर उचकटून दुकानात चोरी करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना सांगवी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई माकन चौक नवी सांगवी येथे रविवारी (दि. 4) पहाटे पाचच्या सुमारास करण्यात आली.

विनोद प्रकाश बाबर (वय 24, रा. चिंचोटी, ता. वसई, जि. पालघर) आणि संतोष नितीन कन्सारे (वय 29, रा. आशानगर, चिंचोटी, ता. वसई, जि. पालघर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई अरुण पांडुरंग नराळे यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव येथे जगताप पेट्रोल पंपाजवळ यश बिअर शॉपी नावाचे एक दुकान आहे. रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास विनोद आणि संतोष लोखंडी कटावणी, लोखंडी स्पॅनरच्या साहाय्याने दुकानाचे शटर उचकट होते. गस्तीवरील पोलिसांना हा याप्रकारे दिसताच त्यांनी तात्काळ दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता ते बिअर शॉपीमध्ये चोरी करण्यासाठी आले असल्याची त्यांनी कबुली दिली. यावरून त्यांना अटक करण्यात आली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.