Pune : बिअर शॉपी बाहेर तरुणाला मारहाण; दीड लाखांची सोनसाखळी हिसकावली

एमपीसी न्यूज – सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बिअर शॉपी बाहेर तरुणाला चौघांनी मारहाण केली. तसेच त्याच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून धूम ठोकली. ही घटना मंगळवारी (दि.30 जुलै) घडली. याप्रकरणी तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार सिंहगड पोलिसांनी तिघांना अटक केली असून एक जण फरार आहे.

किशोर माने, (वय 32), आकाश शिंदे (वय 23), अविनाश देवकाते (वय 25, तिघेही राहता धायरी), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सोमनाथ माने या तरुणाने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माने हे मंगळवारी रात्री न-हे येथील जे.के. बिअर शॉपीतून रात्री साडेअकराच्या सुमारास बाहेर पडले. याचवेळी तिघेही आरोपी त्यांच्यापाठोपाठ आले. व आमचे बिल का दिले नाही असे विचारात त्यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या गळ्यातील दीड लाख रुपयांची सोन्याची चेन हिसकावून रिक्षेतून धूम ठोकली.

सोमनाथ माने यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली असता पोलिसांनी आरोपींना पकडून अटक केली आहे. पुढील तपास सिंहगड पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.