Wakad : बियरबारच्या व्यवस्थापकाकडून तीन मित्रांना मारहाण

एमपीसी न्यूज – बियर पित असताना तीन मित्र एकमेकांना शिवीगाळ करत होते मात्र हे तिघे आपल्यालाच शिवीगाळ केली जात असल्याचा गैरसमज झाल्याने बियरबारच्या व्यवस्थापक व दोन कामगारांनी तरूणांना बियरच्या बाटलीने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. ही घटना डांगे चौकातील एका बियरबारमध्ये बुधवारी (दि. 10) रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली.

शिवम चिंतामणी प्रधान (वय 21, रा. सुतारवाडी, पाषाण) याने याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहूल बियरबारमधील व्यवस्थापक व दोन कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवम व त्याचे दोन मित्र बुधवारी रात्री डांगे चौकातील राहूल बियरबारमध्ये बियर पिण्यासाठी गेले होते. बियर पित असताना तिघे मित्र एकमेकाला शिवीगाळ करत होते.  बियरबारच्या व्यवस्थापक व दोन कामगारांचा आपल्यालाच शिवीगाळ करत असल्याचा गैरसमज झाला.

तिघांनी मिळून फिर्यादी व त्याच्या दोन मित्रांना बियरच्या बाटलीने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. वाकड पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.