Pune : राजकारणात येण्यापूर्वी सार्वजनिक आयुष्यात कसे वागावे याचे प्रशिक्षण घ्यावे – उपराष्ट्रपती

एमपीसी न्यूज – राजकारण्यांनी राजकारणात येण्यापूर्वी सार्वजनिक आयुष्यात कसे वागावे, प्रशासन कसे चालते याचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे, असे मत देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले आहे. 

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे लोणीकाळभोर येथे उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या घुमटाचे नायडू यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एमआयटीचे संस्थापक विश्वनाथ कराड, ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, विजय भटकर, राहुल कराड, खासदार विकास महात्मे उपस्थित होते.

त्याचबरोबर दहशतवाद, हिंसाचार, भेदभाव, गरिबी ही आपल्या पुढील आव्हाने आहेत. दहशतवाद ही गंभीर समस्या असून कुठलाही धर्म त्याचे समर्थन करीत नाही. दहशतवादाविरुद्ध सगळ्या देशांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे मत देखील व्यकंय्या नायडू यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.