Maval : प्रगती विद्या मंदिर प्रशालेच्या संरक्षक भिंतीच्या कामास सुरूवात

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील इंदोरी येथील प्रगती विद्या मंदिर व आ. ना. काशीद (पा) ज्युनियर कॉलेज प्रशालेच्या नवीन इमारत संरक्षक भिंतीच्या कामास सुरुवात झाली. बुधवारी (दि. 11) या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

राज्यमंत्री संजय भेगडे आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे, सचिव संतोष खांडगे, खजिनदार सुरेशभाई शहा, शालेय समिती अध्यक्ष दामोदर शिंदे, विठ्ठलराव शिंदे, ज्योती शिंदे, प्रशांत ढोरे, साहेबराव काशीद, संदीप काशीद, विक्रम पवार, दिनेश चव्हाण, अंकुश ढोरे, बबनराव ढोरे, अरविंद शेवकर, जगन्नाथ शेवकर, रमण पवार, संदीप नाटक, लिलावती शेवकर, मनीषा शेवकर, संगीता राऊत, बबन भसे, ऋषिकेश लोंढे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार श्रीरंग बारणे यांनी ‘प्रशालेच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही’ असे आश्वासन दिले. तर राज्यमंत्री संजय भेगडे यांनी इंदोरी ग्रामस्थ व प्रशालेच्या कामाची स्तुती केली. प्रशालेसाठी आवश्यक ती सर्व मदत देण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य प्रीती जंगले यांनी केले. सूत्रसंचालन लक्ष्मण मखर यांनी केले. पर्यवेक्षक बलभीम भालेराव यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.