Pimple Saudagar : खड्डे बुजविण्यास सुरुवात

एमपीसी न्यूज –  रहाटणी पिंपळे सौदागरमधील प्रभाग क्रमांक 28मधील शिवार चौक ते साई अॅम्बियनस् सोसायटी, कुणाल आयकॉन रोड, महादेव मंदिर ते रहाटणी चौक या दरम्यान पावसामुळे, तसेच विविध खोजकामामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले होते.  त्यात पावसाचे पाणी साचत होते. त्यामुळे नागरिकांना शाळेतील लहान मुलांना याचा त्रास सहन करावा लागत होता.

खड्ड्यांची समस्या लक्षात घेता  नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे व नगरसेविका शीतल काटे यांनी महापालिकेच्या संबंधित विभागाशी बोलून पावसाचे प्रमाण कमी आहे. खबरदारी म्हणून जेट पॅचर कोल्ड इमल्शन या आधुनिक मशिनद्वारे त्वरीत रहाटणी, पिंपळे सौदागर या प्रभागातील सर्व खड्डे बुजविण्यास सांगितले.
महापालिकेतर्फे जेट पॅचर या आधुनिक मशिनद्वारे खड्डे बुजविण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.