Belgavi : भारतातील ‘कोरोना’चा पहिला बळी कर्नाटक राज्यात?

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’ या रोगाने संपूर्ण जगात धुमाकूळ घातलेला आहे. कर्नाटकातही रुग्ण आढळून येत आहेत. ‘कोरोना’चा कर्नाटकातील पहिला बळी गुलबर्गा येथील व्यक्ती ठरला आहे, अशी माहिती कर्नाटक सरकारच्या आरोग्य विभागाने जारी केली आहे. मात्र, हा ‘कोरोना’ या रोगाची लागण झालेला संशयित रुग्ण होता, असे सूत्रांनी सांगितले आहे.

कर्नाटक सरकारने गुलबर्गा येथील आरोग्यधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात हे उघड झाले आहे . महम्मद हुसेन सिद्दीकी (वय 76) असे मयताचे नाव आहे. सौदी अरेबिया येथून तो परतला होता.

सरकारने आदेश काढून अंत्यविधीसाठीची सर्व व्यवस्था चोख करण्याची सूचना केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.