Pune : माजी नगरसेवकांचे आई-वडील व मुलांनाही अंशदायी वैद्यकीय योजनेचा लाभ

महिला व बालकल्याण समितीच्या ठरावाला स्थायीची मंजुरी

एमपीसी न्यूज – माजी नगरसेवकांचे आई-वडील व मुलांनाही आता महापालिकेच्या अंशदायी वैद्यकीय योजनेचा लाभ मिळणार आहे. यासंबंधीचा ठराव स्थायी समितीने मंजूर केला आहे, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे यांनी दिली. 

महापालिकेकडून माजी सदस्य व त्याच्या पत्नी अथवा पतीस, तर विद्यमान सदस्य असल्यास त्या सदस्याच्या संपूर्ण कुटुंबाच्या वैद्यकीय उपचारांचा खर्च केला जातो. त्यासाठी महापालिकेच्या मुख्यसभेने २०१४-१५ मध्ये ठराव करून नगरसेवकांसाठी अंशदायी वैद्यकीय योजनेस मान्यता दिली होती. या योजनेनुसार, नगरसेवकांनी एखाद्या रुग्णालयामध्ये दाखल होत असताना महापालिकेल अगोदर कळवणे आवश्यक असते. यानंतर पालिका प्रशासन रुग्णालयाला पत्र देऊन बिलाची हमी घेते. काही वेळा उपचार पार पडल्यानंतरही महापालिका प्रशासनाकडून नगरसेवकांच्या नावे बीले अदा करण्यात येतात.

या योजनेचा लाभ माजी नगरसेवकांच्या मातापित्यांना आणि मुलांना मिळावा असा प्रस्ताव शिवसेना नगरसेवक संजय भोसले आणि विशाल धनवडे यांनी दिला होता. त्यानुसार महिला व बाल कल्याण समितीने ठराव केला होता. तो स्थायी समिती पुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता त्याला मंजुरी देण्यात अली असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.