Bengal : भारतीय संघाच्या पराभवानंतर बंगालमध्ये 23 वर्षीय तरुणाची आत्महत्या

एमपीसी न्यूज – 19 नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकातील ( Bengal) अंतिम सामना अहमदाबाद येथे खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा  पराभव केला. या पराभवामुळे निराश होऊन बंगाल राज्यातील राहुल लोहार या 23 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना बांकुडा जिल्ह्यातील बेलियाटोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 19 नोव्हेंबर रोजी रात्री 11 सुमारास घडली.
राहुलचा नातेवाईक उत्तम सूर याने दिलेल्या माहितीनुसार, राहुल हा परिसरातील कापड दुकानात नोकरी करत होता. रविवारी भारताचा ऑस्ट्रेलियाशी विश्वचषकातील अंतिम सामना असल्याने त्याने सुट्टी घेतली होती.

भारताचा विश्वचषकातील अंतिम सामन्यात पराभव झाल्याने दुखी होऊन त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. उत्तम च्या म्हणण्यानुसार त्याला कोणत्याही गोष्टीचा त्रास अथवा अडचण नव्हती.याबाबत पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून घेतली आहे. ही घटना घडली तेव्हा घरी कोणीही नसल्याचे त्यांनी सांगितले.   शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील चौकशी सुरू ( Bengal) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.