Bangluru News: फेसबुकवरील बदनामीकारक पोस्टवरून हिंसाचार; पोलीस गोळीबारात दोघांचा मृत्यू, 60 पोलीस जखमी
Bengaluru: 2 dead, 60 cops injured in clash over a communal social media post, MLAs house vandalised काँग्रेस आमदाराच्या एका नातेवाईकाने शेअर केलेल्या पोस्टवरून हा सर्व वाद निर्माण झाला.
एमपीसी न्यूज- सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट शेअर केल्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने मंगळवारी रात्री कर्नाटकमध्ये बंगळुरू येथे काँग्रेस आमदाराच्या घरावर हल्ला केला. संतप्त जमावाने आमदाराच्या घरात घुसून तोडफोड केली, गाडया पेटवून दिल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला. या हिंसाचारामध्ये 60 पोलीसही जखमी झाले आहेत.
काँग्रेस आमदाराच्या एका नातेवाईकाने शेअर केलेल्या पोस्टवरून हा सर्व वाद निर्माण झाला. शहरातील डीजे हळ्ळी आणि केजी हळ्ळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या हिंसक चकमकी झाल्या. पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती बंगळुरुचे पोलीस आयुक्त कमल पंत यांनी दिली.
या हिंसाचारामध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्तांसह 60 पोलीस जखमी झाले आहेत. बंगळुरुमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. डीजे हळ्ळी आणि केजी हळ्ळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लावण्यात आला आहे. सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट शेअर करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती बंगळुरु पोलिसांनी दिली.
Karnataka: Violence broke out in Bengaluru last night over an alleged inciting social media post. 2 died, 110 arrested, around 60 Police personnel injured. As per Bengaluru Police Commissioner, accused Naveen arrested "for sharing derogatory post". Latest visuals from DJ Halli. pic.twitter.com/LKM8m0JuYx
— ANI (@ANI) August 12, 2020
Karnataka: Residence of Congress MLA Akhanda Srinivasamurthy was attacked last night, as violence broke out in Bengaluru over an alleged inciting social media post.
Section 144 imposed in entire Bangalore city. Curfew imposed in DJ Halli and KG Halli police station limits. pic.twitter.com/fEYJvUdomD
— ANI (@ANI) August 12, 2020
DJ Halli Police Station in Bengaluru vandalised last night, as violence broke out in the city over an alleged inciting social media post.
Sec 144 CrPC imposed in Bangaluru city,curfew in DJ Halli & KG Halli police station limits. 2 died, 110 arrested, 60 Police personnel injured pic.twitter.com/CO1ZdIzLbx
— ANI (@ANI) August 12, 2020
Jammu and Kashmir: One soldier lost his life in action and one terrorist has been neutralised in the ongoing Pulwama encounter. Search operation underway. (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/ClBipyAqVb
— ANI (@ANI) August 12, 2020