Lonavala : बेन्टलरच्या कामगारांना 15 हजार प‍ाचशे रुपयांची पगारवाढ

शिवक्रांती कामगार संघटनेचा त्रैवार्षिक करार

एमपीसी न्यूज – चाकण औद्योगिक वसाहतीमधील बेन्टलर आॅटोमोबाईल इंडिया या कंपनीच्या कामगारांना त्रैवार्षिक करारानुसार 15 हजार 500 रुपयांची पगारवाढ करण्यात आली. शिवक्रांती कामगार संघटना व  बेन्टलर आॅटोमोबाईल इंडिया या कंपनीमध्ये नुकत‍ाच कामगारांच्या वेतनवाढीचा करार पार पडल्याची माहिती शिवक्रांतीचे सरचिटणीस अॅड. विजय पाळेकर यांनी दिली. 

या करारानुसार प्रत्येक कामगाराला पहिल्या वर्षी कामगारांना 7 हजार 750, दुसर्‍या वर्षी 4 हजार 650, तिसर्‍या वर्षी 3 हजार 100 रुपये पगारवाढ मिळणार आहे. यासोबत एक भरपगारी रजा, आजारपण रजा, नैमित्तिक रजा, दरमहा दोन हजार रुपये पूर्ण हजेरी भत्ता देण्यात आला आहे. कामगार व त्यांच्या कुटुंबियांना दोन लाखांचा मेडिक्लेम व दहा लाखांचा ग्रुप अॅक्सिडेंटल विमा मोफत देण्यात आला आहे. 1 जानेवारी 2018 पासून हा करार लागू करण्यात आला असून कराराच्या फरकापोटी कामगारांना 55 हजार रुपये मिळणार आहे. या भरघोस पगारवाढीचे कामगारांकडून भंडारा उधळत स्वागत करण्यात आले.

या करारावर शिवक्रांती कामगार संघटनेच्या वतीने सरचिटणीस अॅड. विजय पाळेकर, गुलाब मराठे, रविंद्र साठे, राजेंद्र पवार, हनुमंत कलाटे, रोहन आहेर यांनी तर व्यवस्थापनांच्या वतीने मॅनेजिंग डायरेक्टर संदीप चौधरी, विरेंद्र गायकवाड, मुकुंद गणगणे, वैभव भोंडे, मयुर निघोट कामगार प्रतिनिधी म्हणून दत्ता जाधव, आनंद शिंदे, दिपक टिळेकर, पांडूरंग आहेर, समाधान खोत यांनी स्वाक्षर्‍या केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.