Betting Gang : बेटींग करणारी टोळी अटकेत, सव्वापाच लाखाचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज  – बनावट कागदपत्रे तयार करून बनावट (Betting Gang) सिम कार्ड घेऊन सरकारची बंदी असलेला बेटींगचा व्यवसाय करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला पोलीसांनी गजाआड केले. त्यांच्याकडून 5 लाख 31 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पिंपळे-सौदागर येथे मालपाणी इस्टेटमध्ये करण्यात आली.

विनोद उर्फ बाळू बळीराम अग्रवाल (वय 44, रा. मालपाणी इस्टेट, पिंपळे-सौदागर), सनी जगदिश मंगलानी (वय 32, रा. पीडब्ल्युडी, पिंपरी), हितेश पुरण लोहाना (वय 30, रा. कापसे हाईटस, पिंपरी), रोहित उर्फ सोनू कैलास अग्रवाल (वय 21) आणि शुभम अजय जहागिरदार (वय 28, दोघे रा. मालपाणी इस्टेट, पिंपळे-सौदागर) अशी अटक केलेल्या पाच जणांची नावे आहेत. गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस नाईक मोहम्मद नदाफ यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri Chinchwad Burglary : पिंपरी, चिंचवड, हिंजवडीत घरफोडी; दागिने, रोकड लंपास

आरोपींनी स्वत:च्या आर्थिक (Betting Gang) फायद्यासाठी संगनमत करून बनावट कागदपत्रे तयार केली. ते खरे असल्याचे दाखवून त्याद्वारे बनावट सिम कार्ड घेतले. या सिमकार्डद्वारे आरोपी सरकारने बंदी घातलेला बेटींगचा व्यवसाय करत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार, पोलीसांनी छापा टाकून आरोपींना जेरबंद केले. त्यांच्याकडून वेगवेगळ्या कंपन्यांचे 30 मोबाईल, तीन लॅपटॉप, रोकड, मोबाईल फोन पेटी, पैसे मोजायची मशिन, हिशोबाच्या डायऱ्या असा 5 लाख 31 हजार रूपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक अमरिश देशमुख तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.