Pimpri News : कोविड-19 लसीकरण नोंदणीच्या नावाने धोका धडी पासून सावधान : पोलिसांचे आवाहन 

एमपीसी न्यूज – कोविड-19 लसीकरणाची आतुरतेने वाट बघणाऱ्या जनतेला सायबर गुन्हेगार आता लसीकरण नोंदणीच्या नावाने लुबाडत आहेत. व्हॅक्सिन रेजिस्ट्रेशन करण्यासाठी फेक कॉल, मेसेजेस, ई-मेल लिंक्स शेअर करून लोकांना जाळ्यात फासले जाते. त्यामुळे लसीकरणाच्या अशा बनवाबनवीला बळी पडू नका असे आवाहन सरकार आणि पोलिसांनी केलं आहे. 

देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सर्वात आधी लस दिली जात आहे. याबाबत लसीकरणाचा कार्यक्रम सरकारने जाहीर केला आहे. त्यामुळे सरकार अधिकृत घोषणा करत नाही तोपर्यंत कोणत्याही फसव्या लसीकरणाच्या बनवाबनवीला बळी पडू नका असे आवाहन सरकार आणि पोलिसांनी केलं आहे.

कशाप्रकारे ‘गुन्हेगार’ नागरिकांना फसवतात ?

गुन्हेगाराकडून प्रथमतः नागरिकांना कोविड-19 लसीकरण नोंदणी साठी बनावट कॉल, संदेश, ई-मेल आणि लिंक्स पाठवले जातात.

गुन्हेगार संबंधित व्यक्तीची पूर्ण माहिती हस्तगत करण्यासाठी प्रयत्न करतात. आधार, ई-मेल आयडी, ओटीपी पासवर्ड, संबंधित व्यक्तीचा डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड क्रमांक इत्यादी माहिती घेऊन फसवणूक केली जाऊ शकते.

सुरक्षेसाठी उपाय

– अधिकृत सरकारी विधान, सरकारी वेबसाईट, सार्वजनिक वृत्तवाहिन्या इत्यादी लसीकरण संबंधित माहितीसाठी योग्य व अस्सल स्त्रोत आहेत.

– आपली वैयक्तिक/ खाजगी माहिती जसे की, ओटीपी पिन, आधार क्रमांक, क्रेडिट/ डेबिट कार्ड तपशील कोणाबरोबरही शेअर करू नका.

– कोव्हिड-19 लसीकरण नोंदणी साठी प्राप्त झालेले कॉल्स, मेसेजेस, ई-मेल्स किंवा लिंक्स वर क्लिक करून स्वतःला अडचणीत टाकू नका आणि इतरांसोबत या प्रकारची माहिती प्रसारित नका.

– या प्रकारच्या मेसेजेस, लिंक्स योग्य पडताळणी शिवाय पुढे फॉरवर्ड करू नका.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.