Alandi : आळंदीमध्ये काल भैरवनाथ जन्माष्टमी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज : काल दि.5 डिसेंबर रोजी आळंदी येथील (Alandi) कालभैरवनाथ मंदिरात कालभैरवनाथ महाराज जन्माष्टमी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

वासकर फड यांची सायंकाळी 6 ते 8 कीर्तन सेवा संपन्न झाली. तसेच रात्री 10 ते 12 ह भ प ज्ञानेश्वर महाराज कपलाने यांचे नारदीय कीर्तन संपन्न झाले. यावेळी आळंदी ग्रामस्थ व वारकरी भाविक बहुसंख्येने उपस्थित होते.

Today’s Horoscope 06 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

रात्री 12 वाजता भाविकांनी केलेल्या पुष्पवृष्टीत हा जन्म सोहळा साजरा करण्यात आला. नंतर भैरवी म्हणून काल भैरव आरती झाली.

भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. काल भैरवनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक सजावट करण्यात आली होती. किर्तनाच्या (Alandi) शेवटी स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. आपापसातील वाद मिटवायचे असतील तर संवाद साधा. हा मोलाचा सल्लाही देण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.