Pune : गांधी आणि शास्त्री जयंतीदिनी ‘भजन रंग’ कार्यक्रम

भारतीय विद्या भवन, इन्फोसिस फाउंडेशनतर्फे आयोजन

एमपीसी न्यूज – राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी, भारतीय विद्या भवन पुणे केंद्राच्या वर्धापन दिनानिमित्त ‘भजन रंग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्य्रक्रमांतर्गत होणारा हा ९० वा कार्यक्रम आहे. २ ऑकटोबर, सकाळी १० वाजता हा कार्यक्रम सरदार नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता, पुणे येथे होणार आहे. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

पंडित मुकुंद अनंत मराठे हे भजन गायन करणार आहेत. किशोर कोरडे(तबला),राजीव परांजपे(हार्मोनियम), गणेश पापळ(पखवाज) हे साथसंगत करणार आहेत. गुरुप्रसाद नानिवडेकर सूत्रसंचालन करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.