Vadgaon Maval : पंचायत समितीच्या प्रांगणात 6 गावांना भजनी, 15 गावांना बँजो व 6 गावांना समाजप्रबोधन साहित्य वाटप

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या शोभा कदम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून पुणे जिल्हा परिषद पंचायत विभाग व समाज कल्याण विभागातून सहा ( ६ ) गावांना भजनी साहित्य, पंधरा ( १५ ) गावांना बँजो साहित्य व सहा ( ६ ) गावांना समाज प्रबोधन साहित्य वडगाव मावळ पंचायत समितीच्या प्रांगणामधे वाटप करण्यात आले.

त्यामध्ये नवलाख उंबरे, टाकवे, मंगरुळ, बधलवाडी, मिंडेवाडी, जाधववाडी, निगडे, आंबळे, माऊ, कचरेवाडी, कांब्रे, कोंडीवडे, करंजगाव, उकसान,शिरदे , गोवित्री ,डाहुली ,शिंदेवाडी या एकूण २७ गावांना साहित्य वाटप करण्यात आले.

याप्रसंगी आमदार सुनिल शेळके, वडगाव नगरीचे नगराध्यक्ष मयुर ढोरे, जिल्हा परिषद सदस्या शोभा कदम , भूविकास बँकेचे संचालक काळुराम मालपोटे, संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक अंकुश आंबेकर, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस संघटन मंत्री नारायण ठाकर, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष कैलास गायकवाड, सहकार सेलचे अध्यक्ष नामदेव शेलार, जिल्हा सरचिटणीस प्रविण शेडगे, तालुका सरचिटणीस माणिक तांबोळी, सरपंच दत्तात्रय पडवळ, मोहन घोलप,  सविता भांगरे, करुणाताई गायकवाड , गोपीचंद कचरे, रवींद्र शेलार, माजी सरपंच भिकाजी भागवत, भाऊसाहेब दाभणे, संतोष कोंढरे, बाळासाहेब शेटे, नामदेव बगाड, काळुराम भालसिंगे, संभाजी गुनाट, पांडुरंग पवार, नवनाथ ठाकर, युवा ग्राम पंचायत सदस्य गणेश भांगरे, तुकाराम भांगरे, हरिभाऊ भसे, दिलीप बगाड, बजरंग तांबोळी, बबुतात्या पडवळ, संभाजी बधाले, रामदास तांबोळी, सर्व ग्रामसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येनेे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.