Pune : भामा-आसखेड प्रकल्पाचे काम 6 महिन्यांत पूर्ण होणार – डॉ. अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज – भामा – आसखेड प्रकल्पाचे काम येत्या 6 महिन्यांत पूर्ण होणार आहे, अशी माहिती शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी विरोधी पक्षनेते दीपाली धुमाळ, नगरसेविका नंदा लोणकर, अमृता बाबर, नगरसेवक प्रकाश कदम, गफूरभाई पठाण उपस्थित होते. 

अमोल कोल्हे यांनी शिरूर मतदारसंघात पिण्याच्या पाण्याची, वाहतूक कोंडी यासह अनेक समस्या सोडविण्याची मागणी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली.

भामा – आसखेड प्रकल्प पूर्ण होण्यासाठी शेतकऱ्यां सोबत सातत्याने संवाद साधला जात आहे. स्थानिक आमदार दिलीप मोहिते पाटील, पालकमंत्री अजित पवार आणि मी स्वतः प्रयत्न करीत आहे. या प्रकल्पामुळे पुणेकरांना पाणी मिळणार आहे. तसेच शेतकऱ्यांचेही नुकसान होऊ नये, असे कोल्हे म्हणाले.

दरम्यान, भामा – आसखेड प्रकल्प पूर्ण झाल्यावर पुणेकरांना 3 ते साडे तीन टीएमसी पाणी मिळणार आहे. पिंपरी – चिंचवड महापालिका, वाडगावशेरी, नगररोड, हडपसर भागांतील नागरिकांना पाणी मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.