Bhama Askhed News : भामा नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा 

एमपीसी न्यूज : भामा आसखेड धरण पूर नियंत्रण कक्षाने भामा नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

भामा आसखेड धरण जलाशय पातळी सकाळी 10 वाजता 670.90 मी आणि एकूण पाणीसाठा (221.513 दलघमी 95.79 टक्के) झाला आहे.भामा आसखेड प्रकल्पात पाण्याचा येवा सुरू आहे.

पाणलोट क्षेत्रातील पाण्याचा येवा बघता पूढील 10 ते 15 तासात प्रकल्प 98 टक्के होऊ शकतो. त्यानंतर पाणलोट क्षेत्रातील पाऊस व पाण्याचा येवा यानुसार सांडव्यावरून भामा नदीत विसर्ग सोडण्यात येणार आहे.

नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत, असे भामा आसखेड धरण पूर नियंत्रण कक्षाने सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.