Ashadhi Wari : पालखी सोहळ्या सोबत फिरते भांडार गृह

एमपीसी न्यूज  – संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी आषाढी वारी (Ashadhi Wari)  निमित्त लागणाऱ्या विविध वस्तू साहित्यांनी संस्थानचे भक्त निवास येथील भांडरगृह सज्ज झाले आहे.

पालखी सोहळ्यात पालखी सोबत असणारे पदाधिकारी, मानकरी, सेवकवर्ग , कर्मचारी यांच्या राहण्याची जेवण्याची सोय त्यासाठी लागणारे साहित्य वस्तू इ. याची नोंद या भांडारगृहा तर्फे करण्यात येते.
पूजेवेळी लागणाऱ्या वस्तू साहित्याचाही समावेश यामध्ये आहे. पालखी (Ashadhi Wari) सोहळ्यात स्वयंपाकासाठी लागणारी भांडी, अन्न धान्य, (किराणा माल), गॅस शेकडी,  तंबू, ताडपत्री, रेनकोट, अब्दागिरी , शाली, पालखी वरील छत्र्या ,स्टेशनरी साहित्य, दानपेट्या, पाट, चौरंग, वीज सामान, मंडपासाठी लागणारे वस्तू साहित्य, गाद्या , उश्या , बेडशीट, पंखा, घड्याळ, प्रभावळ,पत्रावळ, बैलजोडी त्यासाठी लागणारे साहित्य वस्तू, रथाला लागणारे आवश्यक साहित्य वस्तू, कपाट, वारकरी साहित्य व वस्तू इतर विविध वस्तू साहित्यांचा यात समावेश आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.