Bharat Bandh Public transport news : अतिसंवेदनशील भागात एसटी बंद राहणार ; रिक्षा, पीएमपीएमएल बससेवा सुरू राहणार

एमपीसी न्यूज : केंद्र सरकारच्या कृषी विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी 8 डिसेंबर रोजी देशभरात ‘भारत बंद’ची घोषणा करण्यात आली आहे. त्या पार्श्वभुमीवर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील एसटी बससेवा अतिसंवेदनशील भागात बससेवा पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे. परंतु रिक्षा आणि बससेवा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.

एसटी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत बंदच्या पार्श्वभुमीवर एसटी सेवा केवळ अतिसंवेदनशील भागात पुर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे. परंतु नियमित वेळापत्रकानुसार ठरलेली बससेवा सुरूच राहणार आहे. पोलीस प्रशासनाकडून संवेदनशील भागाची माहिती मिळाल्यानंतरच त्याठिकाणची बससेवा बंद केली जाईल, असे स्पष्ट केले.

दरम्यान, पुण्यातील ओला-उबेर व विविध रिक्षा संघटनांकडून रिक्षासेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच खासगी चारचाकी वाहने देखील सुरू असणार आहेत.

पीएमपीएमएल प्रशासनाकडून शहरातील मध्यवर्ती पेठांसह उपनगरातील बससेवा सुरू राहणार असल्याचा निर्णय कळविला आहे. बंदला तोडफोड, जाळपोळ असे प्रकार घडून हिंसक वळण लागले तर आयत्यावेळी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.