Bharat Bandh Update : जाणून घ्या, आज काय काय असेल बंद….

एमपीसी न्यूज – केंद्रसरकारच्या कृषी कायद्याविरोधात सुरु झालेल्या देशव्यापी भारत बंदमध्ये आज (मंगळवार. दि. 8 डिसेंबर) पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. तसेच काही बँका, बाजार आणि इतर सुविधाही आज सकाळी 8 ते दुपारी 3 या वेळेत बंद राहणार आहेत.

आज काय बंद राहील…

# बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांचा भारत बंदला पाठींबा- ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन, महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन संघटनेकडून जाहीर

# अतिसंवेदनशिल भागात एसटी बंद राहणार ; रिक्षा, पीएमपीएमएल बससेवा सुरू राहणार

# पुण्यातील सर्व दुकानं दुपारी 12.30 पर्यंत बंद राहणार – व्यापारी महासंघाचा निर्णय

# माथाडी कामगार संघटना आणि व्यापारी वर्गाने पाठिंबा; एपीएमसीमधील पाचही मार्केट बंद ठेवण्यात येणार

# 18 विरोधी पक्षांचा या ‘भारत बंद’ला पाठिंबा

# मावळ राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष यांच्या वतीने भारत बंदला पाठिंबा

# पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध कामगार संघटनांचा पाठिंबा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.