Vishrantwadi News: संविधान दिनानिमित्त भारत जोडो यात्रे समर्थनार्थ संविधान बचाओ पदयात्रा

एमपीसी न्यूज: संविधान दिनानिमित्त भारत जोडो यात्रे समर्थनार्थ संविधान बचाओ पद यात्रा रविवार 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वा विश्रांतवाडी मुकूंद राव आंबेडकर चौक ते येरवडा येथील भगतसिंह पुतळा ते महात्मा गांधी पुतळा पुणे स्टेशन आणि भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुणे स्टेशन अशी ही पदयात्रा काढण्यात आली.

काँग्रेसचे वॉर्ड अध्यक्ष सचिन भोसले आयोजक तर विविध पक्षातील व संघटना मधील लोकांनी पाठिंबा दिला. यात्रे चि सुरुवात कबुतर पक्षी हवेत सोडून स्वतंत्रता समानता चा संदेश दिला.

Chikhali News : महाआरोग्य व भव्य नेत्रचिकित्सा शिबिराला प्रतिसाद

संविधान के सन्मान मे हम सब मैदान मे, संविधान बचाओ, देश बचाओ, जात पात के बंधन तोडो भारत जोडो भारत जोडो, नफरत छोडो भारत जोडो अशा घोषणा देण्यात आल्या. एकता अखंडत, सद्भावना, बन्धुत्वाचा संदेश देत पद यात्रा डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे पुष्पहार अर्पण करून पद यात्रेचा समारोप करण्यात आला.

नंदू राक्षे, किरण खंडाळे, नीलिमा ताई कांबळे, सोपान भोसले, विनोद दादा पवार,संग्राम बेडे,प्रकाश भाऊ सोनवणे, सतीश म्हस्के, यशराज पारखे, वाजिद शेख, शारुख शेख, लोकयतचे उदय व प्रतीक, भीमराव वानखेडे, संग्राम रोहम सुशील साळुंके, शिवराम शिंदे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.