Moshi News : भारत माता की जय,वंदे मातरम, अशा गर्जनांनी मोशी परिसर दुमदुमला

 एमपीसी न्यूज – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्यावतीने इनोव्हेटिव्ह शाळा मोशी व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या सहकार्याने ‘घरो घर तिरंगा अभियान’ रॅली गुरुवारी काढण्यात आली.भारत माता की जय,वंदे मातरम, अशा गर्जनांनी मोशीतील रिव्हर रेसिडेन्सी, स्वराज रेसिडेन्सी व परिसर दुमदुमून गेला.  

सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या रॅलीत चारशे शालेय विद्यार्थी, शिक्षक, ज्येष्ठ नागरिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकारी यांचा सहभाग होता.भारत माता की जय,वंदे मातरम,अशा गर्जनांनी मोशीतील रिव्हर रेसिडेन्सी, स्वराज रेसिडेन्सी व परिसर दुमदुमून गेला.प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातामध्ये तिरंगा ध्वज होता.भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध घोषणा व स्वच्छतेच्या बाबतीत जनजागृती करणारे संदेश या रॅलीचे माध्यमातून देण्यात आले.

या रॅलीत संस्थेचे अध्यक्ष संजय सिंग, संचालक प्रशांत पाटील, तानाजी दाते, सहाय्यक आरोग्य अधिकारी, परिवहन कार्यालयाच्या निरीक्षक अनुराधा जुमडे, कोमल गाडेकर, अमृत गोडसे, रवींद्र गावडे, आरोग्य निरीक्षक राजेंद्र उज्जैनवाल,वैभव घोळवे, संजय मानमोडे, क्षितिज रोकडे आदी सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.