Bharati Vidyapeeth : नागरिकांना चाकूचा धाक दाखवून धमकावणारा अट्टल अटकेत

एमपीसी न्यूज – येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना चाकूचा धाक (Bharati Vidyapeeth) दाखवून धमकावणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. मोन्या उर्फ संकेत संतोष विकारे (वय 28 रा. बिबेवाडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. हि कारवाई पोलिसांनी सोमवारी (दि.15) कात्रज येथील जैन मंदीर परिसरात केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पोलिस पथकातील कर्मचारी मितेश चोरमोले व अभिनय चौधरी यांना खबर मिळाली की, एकजण हातात चाकू घेऊन येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना धमकावीत आहेत. पोलिसांची टिम तातडीने घटनास्थळी पोहचली. त्याचा पाठलाग करून पोलिसांनी मोन्याला ताब्यात घेतले.

Nigdi Accident : निगडी येथे कारच्या धडकेत मृत झालेल्या पादचाऱ्याची पटली ओळख

यावेळी त्याच्याकडून पोलिसांनी रॅम्बो चाकू जप्त केला. आरोपीवर (Bharati Vidyapeeth) धमकावणे व आर्म ऍक्ट अंतर्गत बेकायदेशीर हत्यार बाळगण्याचा गुन्हा दाखल केला असून आरोपीवर या आधीही चोरी, खूनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल असून पोलीस त्याचा शोध घेतच होते. याचा पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.