Talegaon Dabhade News : भारतीय जनता पक्षाचे सभागृहनेते अमोल जगन्नाथ शेटे यांचा राजीनामा मंजूर

0

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगर परिषदेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे सभागृहनेते अमोल जगन्नाथ शेटे यांनी आपल्या गटनेते पदाचा राजीनामा  दिला आहे. 

सदर राजीनामापत्र नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांचेकडे 30 मार्च रोजी दिले असून नगराध्यक्षांनी शेटे यांचा सभागृह नेते पदाचा राजीनामा मंजूर केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या 2016 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत  शेटे प्रभाग क्रमांक आठ मधून  भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून विजयी झाले होते. या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये पक्षाने त्यांच्याकडे आरोग्य समिती सभापती, नियोजन व विकास समिती सभापती पदाची जबाबदारी दिली होती. ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली.

मागील वर्षी जानेवारीमध्ये पक्षाने सभागृह गटनेते पदाची जबाबदारी सोपवली होती. यापुढे भविष्य काळामध्ये इतर सदस्यांना या पदावर काम करण्याची संधी मिळावी म्हणून गटनेते पदाचा राजीनामा दिला असल्याचे शेटे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment