Goa News : भारतीय कामगार सेना गोव्यातील श्रमिकांच्या पाठीशी : डॉ. रघुनाथ कुचिक

एमपीसी न्यूज : गोव्यातील वेरना येथील इंडिगो रेमिडिज लि. या औषधं उत्पादन करणा-या खासगी उद्योगांतील बहुसंख्य कामगारांनी भारतीय कामगार सेनेचे अधिकृत सभासदत्व स्विकारले. केंद्र सरकारच्या कामगार कायद्याद्वारे केलेल्या कामगारांच्या शोषणासंदर्भात जनजागृती व्हावी म्हणून गोव्यातील प्रमुख कामगार प्रतिनिधींबरोबर अभ्यास शिबीर घेण्यात येणार आहे.

भारतीय कामगार सेना गोव्यातील श्रमिकांच्या पाठीशी उभी राहून खंबीरपणे लढा देईल, असा विश्वास डॉ. कुचिक यांनी कामगारांना दिला. यावेळेस शिवसेना उपनेते व भारतीय कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस डॉ. रघुनाथ कुचिक, कामगार सेनेचे सहचिटणीस शुभम दिघे, प्रफुल्ल सारडा, राहुल बोहरा उपस्थित होते.

डॉ. कुचिक यांच्या हस्ते भारतीय कामगार सेनेच्या कंपनीतील युनिट नामफलकाचे अनावरण करण्यात आले. त्यांनी सभेला संबोधित करून कंपनीच्या व्यवस्थापनाची बैठक घेऊन संघटनेची ध्येय धोरणे, कंपनीकडून कामगारांना मिळणारी वागणूक, दबाव अशा विषयांवर चर्चा केली.

बैठकीस कंपनीचे व्यवस्थापन प्रतिनिधि अरविंद प्रभु, रुषल, करुणाकर, यूनिट अध्यक्ष प्रशांत नाईक, सरचिटणीस सर्वेश तळेकर, प्रतिनिधि अप्पा गुरव, राघवेंद्र पवार, भारतीय कामगार सेनेचे गोवा राज्य मुख्य संघटक शंकर पंडित, विनायक उपस्थित होते. कामगारांच्या समस्यांबाबत लवकरच स्वतंत्र बैठक घेण्यात येईल व त्यात कामगारांच्या प्रश्नांबाबत चर्चा व तोडगा काढण्यात येईल, असे डॉ. कुचिक म्हणाले. बैठकीनंतर डॉ. कुचिक यांनी औद्योगिक परिसरातील कारखान्यांचा दौरा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.