Mumbai News : भारती सिंह पाठोपाठ पती हर्ष लिंबाचियाला देखील NCB कडून अटक

0

एमपीसी न्यूज : प्रसिद्ध विनोदी कलाकार भारती सिंह (Comedian Bharti Singh) पाठोपाठ तिचा पती हर्ष लिंबाचिया (Haarsh Limbachiyaa) याला देखील NCB ने अटक केली आहे. भारती सिंहला काल तर आज (22 नोव्हेंबर) च्या सकाळी तिच्या पतीला देखील अटक झाली आहे. दरम्यान भारती आणि हर्षच्या घरामध्ये अंमली पदार्थ असल्याचं आढळलं होतं. त्यानंतर त्यांची चौकशी झाली. पुढे चौकशीमध्ये त्यांनी ड्रग्सचं सेवन केल्याचेही कबुल केल्याची माहिती देण्यात आली आहे.

शनिवारी (21 नोव्हेंबर) दिवशी भारती आणि हर्षच्या मुंबईतील अंधेरी, वर्सोवा, लोखंडवाला परिसरात त्यांच्या घरांमध्ये एनसीबी टीम्सकडून धाड टाकण्यात आली होती. दरम्यान एनसीबीच्या ताब्यात असलेल्या काही ड्र्ग्स पेडलर्सकडून त्यांच्या नावांचा उल्लेख झाल्यानंतर काल सकाळी छापेमारी झाली आहे.

एनसीबीने भारती सिंगचं घर आणि प्रोडक्शन ऑफिसमध्ये काल छापेमारी केली तेव्हा त्यांना 86.5 ग्राम गांजा आढळला. दोघांनीही गांजा ओढल्याची कबुली एनसीबी टीम्सकडे केली आहे. आता अटकेनंतर दोघांना आज दोघांनाही कोर्ट समोर दाखल केले जाईल.  

‘द कपिल शर्मा ‘या कॉमेडी शो मध्ये भारती सिंह सहभागी आहे. तर हर्ष आणि भारती सध्या टेलिव्हिजनवर India’s Best Dancer चं सूत्रसंचलनदेखील करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III