Dehu News : ‘वात्सल्य’ मतिमंद मुलांची निवासी शाळेत भाऊबीज उत्साहात

0

एमपीसी न्यूज – देहू येथील ‘वात्सल्य’ मतिमंद मुलांची निवासी शाळेत भाऊबीज व दिवाळी पाडवा उत्साहात साजरा करण्यात आला. पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता युवा मोर्चा युवतींच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.

सोशल मीडिया संयोजिका पुजा आल्हाट, महिला मोर्चा उपाध्यक्ष सोनम जांभुळकर, वैद्यकीय आघाडी अध्यक्ष विजया आल्हाट व भोसरी चऱ्होली मंडल उपाध्यक्ष सिंधूताई आल्हाट यांनी मुलांचे औक्षण केले. या उपक्रमाअंतर्गत दिवाळी पाडव्याची भेट म्हणून निवासी शाळेला राशन देण्यात आले.

याप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी चिंचवड अध्यक्ष संकेत चोंधे, सरचिटणीस दिनेश यादव, उपाध्यक्ष शिवराज लांडगे, चिटणीस रवी जांभुळकर, चिटणीस प्रकाश चौधरी, ओबीसी विभागाचे संयोजक राजेश डोंगरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III