Bhavana Gawali: मोदींचे हात मजबूत करणार -भावना गवळी

एमपीसी न्यूज – आज शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. यावेळी (Bhavana Gawali)यवतमाळ व वाशिमचे जिल्हाप्रमुख उपस्थितीत होते.

या वेळी गवळी यांनी पत्रकारांशी संवाद साधला . त्या म्हणाल्या गेली (Bhavana Gawali )पंचवीस वर्षांपासून मी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहे. माझ्या कार्यकाळात अनेक कामे मी केली आहेत. वर्धा नांदेड रेल्वे मार्ग मी पुढाकार घेऊन काम मी केलं. मी नाराज नसल्याचं त्यांनी म्हटले आहे. पण मला या गोष्टीची खंत आहे. मी कुठे कमी पडले हे मला पाहावं लागेल.

Khalumbre: खालुम्ब्रे येथे तरुणाकडून 61 हजार रुपयांचा गुटखा जप्त

‘माझ्यासाठी पक्ष महत्त्वाचा आहे. पक्षाचे नेते महत्त्वाचे आहेत.(Bhavana Gawali ) माझ्यासाठी शिंदे साहेब महत्त्वाचे आहे. आदरनीय मोदी साहेब महत्त्वाचे आहेत. फडणवीस साहेबांनी मतदारसंघाच्या विकासासाठी पाठबळ दिलं. मुख्यमंत्री शिंदे साहेबांसोबत अनेक मुद्द्यावर पक्षाच्या दृष्टीकोनातून चर्चा झाली आहे. उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी मला दिली आहे. त्यांच्यासाठी मी प्रचार करेल यात काही दुमत नाही. असं ही भावना गवळी म्हणाल्या.’

‘मी प्रचाराला जात नसल्याने नाराज असल्याच्या चर्चा आहेत. मी नाराज होणारी नाही. मला खंत आहे. मी इतकी वर्ष कामे केली तरीही, तिकीट दिलं नाही. इतर खासदारांना उमेदवारी मिळाली. मला खंत वाटली. त्यामुळे मी बाहेर पडली नाही. मुख्यमंत्री माझ्या पक्षाचे सर्वेसर्वा आहेत.

 

माझ्या वडिलांनी 85 पासून शिवसेनेचं काम केलं. आमच्या घराणं पक्षासाठी योगदान दिलं आहे.मी जयश्री ताईंचे हात मजबूत करणार आहे. मोदींचे हात मजबूत करणार आहे.’ अस ही गवळी म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या ,‘25 वर्षापासून मी काम करत आहे. मी जिल्हाप्रमुख म्हणून काम केलं. लहानपणापासून शिवसेनेत काम करण्याचं बाळकडू होतं. काही तरी मिळतंय म्हणून मी काम करत नाही. मी 25 वर्ष खासदार आहे.

25 वर्ष परिवार म्हणून मी या मतदारसंघात काम केलंय.’ ‘आता हा विषय संपलेला आहे. आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहे. अनेक संघर्ष पहिले आहेत. पक्षाचा निर्णय आहे. मला वाटत नाही की काही बोलले पाहिजे.’

‘पक्षश्रेष्ठींचा निर्णय महत्त्वाचा असतो. जे झालं ते भूतकाळ आहे. आता भविष्याकडे पाहते आहे. मी शिवसेनेसाठी काम करत राहणार. माझी पुढची राजकीय वाटचाल हे मुख्यमंत्री शिंदे ठरवतील. मी नाराज होणाऱ्यांपैकी नाही. संघर्ष करणारी मी आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.