Bhigwan Accident News : मारुती इको कार ट्रॅक्टरवर आदळून दोन ठार; दोन जखमी

मृतामध्ये मुंबई येथील सहाय्यक फौजदाराचा समावेश

0

एमपीसीन्यूज : ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून आलेली मारुती इको कार ट्रॅक्टरवर आदळली. या भीषण अपघातात ‘मारुती इको’मधील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. मृतामध्ये नवी मुंबई येथील एका सहाय्यक फौजदाराचा समावेश आहे.

पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवण येथील मदनवाडी गावाच्या हद्दीत उड्डाणपुलावर आज, गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात घडला.

विनोद दामोदर कोळी (वय 40, चाणणात्य, ता. उरण, जि. रायगड) व सहाय्यक फौजदार सूर्यकांत के. गायकवाड (वय 55, रा. पोलिस लाईनजवळ, श्रीपाद सोसायटी, ता. उरण, जि. रायगड) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. यातील गायकवाड हे नवी मुंबई पोलीस दलात सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत होते.

तर नासीर शकूर मन्सुरी (वय 47 , रा. चारफाटा, ओएनजीसी रोड, उरण, जि. रायगड) व विनोद ( पूर्ण नाव माहीत नाही) हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर इंदापूर उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरु आहेत.

_MPC_DIR_MPU_II

भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर- पुणे लेनवर पुण्याच्या दिशेने डाव्या बाजुने ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर भरधाव जात होता. मदनवाडी उड्डाणपुलावर या ट्रॅक्टरने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे पाठीमागून आलेली मारुती इको कार ट्रॅक्टरवर जोरात आदळली.

या भीषण अपघातात मारुती इकोमधील दोघांचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले.

अपघाताचे वृत्त समजताच भिगवण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलविले.

भिगवणचे सहाय्यक पोलिस निरिक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक विनायक दडस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment