Pimpri : भिकू वाघेरे (पाटील) प्रतिष्ठानतर्फे श्रीमद् भागवत कथाचे मंगळवारपासून आयोजन

एमपीसी न्यूज -दिवंगत महापौर भिकू वाघेरे (पाटील) प्रतिष्ठानतर्फे मंगळवार, २२ जानेवारी ते २९ जानेवारी दरम्यान, पिंपरी गावातील भैरवनाथ चौक येथे ‘श्रीमद् भागवत कथा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. भिकू वाघेरे (पाटील) प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी महापौर संजोग वाघेरे यांनी हि माहिती पत्रकार परिषदेत दिली. प्रतिष्ठानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञास श्रोत्यांनि मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, चंद्रकांत गव्हाणे, चिंधाजी गोलांडे, जयवंत शिंदे, अण्णा कापसे आदी यावेळी पत्रकार परिषदेस उपस्थित होते.

या भागवत कथा कार्यक्रमाचे संयोजन भिकू वाघेरे (पाटील) प्रतिष्ठान, जोग महाराज प्रसाद दिंडी, संत सावतामाळी ट्रस्ट आणि शिवदत्त प्रसादिक दिंडी यांनी केले आहे.

अशी आहे कार्यक्रमची रूपरेषा
दरम्यान, २२ जानेवारीला भागवत माहात्म्य आणि धुंदुकारी, दि. २३ विदुर कथा, परिक्षिती जन्म, दि. २४ भक्त प्रल्हाद चरित्र व वराह अवतार, दि. २५ गजेंद्र मोक्ष, दि. २६ श्रीकृष्ण जन्म व बाललीला, दि. २७ रुक्मिणी स्वयंवर आणि दि. २८ रोजी सुदामा भेट या विषयावर सुश्राव्य कीर्तन कथा होणार आहेत. रविवार दि. 29 रोजी कथाव्यास हभप ऍड. शंकर महाराज शेवाळे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. तरी श्रोत्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.