Bhiwandi News : तीन मजली इमारत कोसळली, मृतांचा आकडा 8 वर

एमपीसी न्यूज – ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये आज (21 सप्टेंबर) तीन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली. भिवंडीतील पटेल कंपाऊंड भागात पहाटे तीन साडेतीनच्या सुमारास ही इमारत कोसळली.

या इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 8 वर गेला असून इमारतीत अजूनही 20 ते 25 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच पहाटे झालेल्या या दुर्घटनेमुळे मृतांचा आकडाही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या दुर्घटनेतून वाचवत इमारतीतील 25 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली.

दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि तातडीने मदतकार्य सुरू केलं. यावेळी एनडीआरएफच्या टीमने चिमुकल्याला दुर्घटनाग्रस्त इमारतीतून सुखरूप बाहेर काढलं.

ही इमारत 43 वर्ष जुनी होती. या तीन मजली इमारतीतील 40 फ्लॅट्समध्ये 150 रहिवाशी वास्तव्यास होते. सदर इमारत धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये नव्हती, असं भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

आतापर्यंत सुखरूप सुटका करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे:
१) हेदर सलमानी( पु/२०वर्ष)
२) रुकसार खुरेशी(स्त्री/२६ वर्ष)
३) मोहम्मद अली(पु/६० वर्ष)
४) शबीर खुरेशी(पु/३० वर्ष)
५) मोमीन शमीऊहा शेख (स्त्री/४५ वर्ष)
६) कैसर सिराज शेख (स्त्री/२७ वर्ष)
७) रुकसार जुबेर शेख ( स्त्री/ २५वर्ष)
८) अबुसाद सरोजुद्दीन अन्सारी (पु/१८ वर्ष)
९) आवेश सरोजुद्दीन अन्सारी (पु/२२ वर्ष)
१०) जुलेखा अली शेख (स्त्री/५२ वर्ष)
११) उमेद जुबेर कुरेशी (पु/४वर्ष)

मृत व्यक्तीची नावे पुढीलप्रमाणे:
१) झुबेर खुरेशी(पु/३० वर्ष)
२)फायजा खुरेशी(पु/५वर्ष)
३)आयशा खुरेशी(स्री/७वर्ष)
४)बब्बू(पु/२७वर्ष)
५) फातमा जुबेर बबु (स्त्री/२वर्ष)
६) फातमा जुबेर कुरेशी (स्त्री/८वर्ष)
७) उजेब जुबेर (पु/६ वर्ष)
८) असका आबिद अन्सारी (पु/१४ वर्ष)
९) अन्सारी दानिश अलिद (पु/१२ वर्ष)
१०) सिराज अहमद शेख (पु/२८ वर्ष)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.