Chinchwad : भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांना भोई समाजाचा पाठिंबा

एमपीसी न्यूज –  चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांना पिंपरी-चिंचवड शहरातील भोई समाजाने पाठिंबा जाहीर केला आहे. भोई समाजाची शिखर संस्था असलेल्या भोईराज (हिंदू-भोई) सामाजिक ट्रस्टने माजी नगरसेवक शंकर जगताप तसेच स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांच्याकडे आमदार जगताप यांना पाठिंबा देणारे पत्र दिले.

यावेळी भोईराज (हिंदू-भोई) सामाजिक ट्रस्टचे अध्यक्ष नितीन कराळे, उपाध्यक्ष अशोक जम, सचिव हनुमान शिनगारे, खजिनदार योगेश घुमे, कार्याध्यक्ष रघुनाथ मुसळे, सहसचिव किरण शिनगारे, विनायक कऱ्हाळे, प्रमुख सल्लागार श्रीकांत धुमाळ, हिशोब तपासणीस संदिप कारळे, सदस्य चेतन तारू, रवींद्र वाघवले, नितीन शिनगारे, गोरखनाथ काटवटे, दिलीप भोकरे, मंगल भोकले आदी उपस्थित होते.

नितीन कराळे म्हणाले, “चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा विकास हा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पाठपुराव्याने आणि परिश्रमाने झाला आहे. पिंपरी-चिंचवडमधील सर्वाधिक विकासशील मतदारसंघ म्हणून चिंचवड मतदारसंघाची ओळख आहे. या मतदारसंघात झालेला विकास हा संपूर्ण शहरात चोहोकडे होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांनी आमदार म्हणून निवडून येत पुढे मंत्री होणे गरजेचे आहे. शहराच्या विकासाचा विचार करून आमदार लक्ष्मण जगताप यांची चिंचवड विधानसभा मतदारसंघात हॅट्रिक व्हावी यासाठी मतदारसंघातील तमाम भोई सामाजाचा त्यांना पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.