Pune News : अंगातील शिरलेले भूत काढण्याच्या बहाण्याने भोंदूबाबाचे नवविवाहितेसोबत अश्लील चाळे

एमपीसी न्यूज : नवविवाहित महिलेच्या अंगात शिरलेले भूत काढण्यासाठी पतीने तिच्यासोबत अनैसर्गिक संबंध ठेवावे असे सांगून भूत काढण्याचा बहाना करून 24 वर्षीय नवविवाहितेसोबत भोंदू बाबाने अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारानंतर भोंदूबाबासह या नवविवाहितेचा पती आणि सासरच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी येरवडा येथील आसिफ बाबा याच्यासह पती व त्याच्या इतर नातेवाईक अश्या 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात 24 वर्षीय विवाहित महिलेने तक्रार दिली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिलेचा प्रेमविवाह झाला आहे. 31 जानेवारी 2021 रोजी त्यांचा विवाह झाला होता. मात्र लग्नानंतर काही दिवसांनी आरोपी पतीने आपले खरे रूप दाखवण्यास सुरुवात केली. आरोपीने एकदिवस मेकअप नीट न केल्याच्या कारणावरून वाद घालत मारहाण केली तेथून पीडित महिलेच्या छळाला सुरुवात झाली. तिचा पगार देखील जबरदस्तीने घेतला जात होता.

दरम्यान पीडित महिलेच्या सासू-सासर्‍यांनी तिला येरवड्यातील सत्तर वर्षीय आसिफ बाबाकडे नेले होते. त्या बाबाने विवाहितेला उपचार करण्यासाठी म्हणून खोलीत नेले. त्यावेळी त्याने विवाहितेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तर बाहेर येऊन सासू-सासऱ्यांना हिला पतीसोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवावे लागतील. तिच्या अंगात भूत आहे, ते काढावे लागेल, असेही सांगितले.

फिर्यादीचा पती आणि त्याच्या आई-वडिलांचा या भोंदूबाबावर जास्त विश्वास असल्याने पतीने पीडितेसोबत अनैसर्गिक संभोग केला. तसेच पगार व इतर कारणांनी छळ सुरू केला. तरीही त्या संसार टीकवण्यासाठी प्रयत्न करत होत्या. मात्र छळ जास्त होत होता तसेच पती चारित्र्यावर संशय घेउन मारहाण करत असे. त्याचबरोबर ती वेडसर असल्याची माहिती पसरवून त्यांची बदनामी केली. तर त्यांना घरातून हाकलून दिले. याबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी प्राथमिक तपास करत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.