BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : मनीष गार्डन सोसायटीमधील अंतर्गत कामांचे भूमिपूजन

आमदार महेश लांडगे यांच्या स्थानिक विशेष निधीतून होणार सोसायटी मधील अंतर्गत कामे

एमपीसी न्यूज – अजमेरा पिंपरी येथील मनीष गार्डन या सोसाटीमध्ये आमदार महेश लांडगे यांच्या आमदार स्थानिक विशेष निधीमधून अंतर्गत कामे केली जाणार आहेत. या अंतर्गत कामांचे भूमिपूजन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.

भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी अर्जुन ठाकरे, सचिन शिंदे, वैशाली खाडे, वीणा सोनवलकर, आशा काळे, अमित परदेशी, विक्रांत सरोदे, हेमंत शिर्के, अमित देशमुख, संभाजी मगर, संजय मुळे, सुधाकर साटम, नितीन मंडलिक, प्रमोद कदम, महावीर आवडे, आनंद वाशीकर, विश्वास कुलकर्णी, अतुल सोनवणे, किशोर उपासे, राजेश गुजर आदी उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे यांच्या स्थानिक विशेष निधीतून अजमेरा पिंपरी मधील उद्याननगर येथील मनीष गार्डन या सोसायटीमध्ये अंतर्गत कामे करण्यात येणार आहेत. या सोसायटीमध्ये सुमारे 176 सदनिकाधारक आहेत. जवळपास या सोसायटीमध्ये 700 ते 800 नागरिक राहतात. सोसायटीमधील अंतर्गत कामामध्ये काँक्रीटीकरण केले जाणार आहे. या कामाचा शुभारंभ आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आला. या कामाला तात्काळ सुरुवात करण्यात येणार असून येत्या दोन ते तीन आठवड्यामध्ये हे काम पूर्ण होणार आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like