Bhor : भूगोल फांऊडेशनतर्फे किल्ले रायरेश्वर येथे स्वच्छता मोहीम

एमपीसी न्यूज- भूगोल फांऊडेशन व वन विभाग- भोर यांच्या संयुक्त विद्यमाने भोर शहर व किल्ले रायरेश्वर येथे पर्यावरणविषयी जनप्रबोधन, स्वच्छता मोहीम अभियान राबवण्यात आले.

भोर येथे गडकिल्ले संवर्धन, पर्यावरण विषयी जनप्रबोधन, स्वच्छता विषयी व प्लॅस्टिकचा वापर न करण्याबाबत शहरातील नागरिकांना जनप्रबोधन फेरी काढून विविध सूचना, संदेश देऊन आपला परिसर स्वछ ठेवण्या बाबत आवाहन करण्यात आले. स्थानिकांना या मोहिमेत सामील होण्याचेही आवाहन करण्यात आले.

यावेळी स्थानिक रहिवाशी व बाजारपेठेतील दुकानदार यांना स्वच्छता, प्लॅस्टिकचा वापर न करणे, झाडे लावून त्यांचे संवर्धन करणे, पाण्याचा अतिरिक्त वापर टाळणे, जंगलाना वणवे न लावणे, जंगलतोड न करणे, गडकिल्ल्यांवर स्वच्छता व पावित्र्य राखणे अशा प्रकारचे संदेश आणि माहिती असणारी पत्रके वाटण्यात आली.

भोर बस स्थानकापासून निघालेली ही जनप्रबोधन फेरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा चौकात समाप्त झाली. यावेळी भूगोल फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल (नाना) वाळुंज यांनी पर्यावरण वाचविण्यासाठी व गडकिल्ले संवर्धन, वृक्षारोपण व संवर्धन, जंगलतोड न करणे, प्लॅस्टिक चा वापर न करणे या विषयी मार्गदर्शन केले.

_MPC_DIR_MPU_II

या फेरीमध्ये भूगोल फाउंडेशनचे ज्येष्ठ नागरिक महिला, लहान मुले व संतनगर मित्र मंडळाचे कार्यकर्ते व परिसरातील नागरिक, वनविभाग-भोर परिक्षेत्रचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यानंतर सर्वजण रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्यावर जाऊन तेथून किल्ल्यावर जाण्यासाठी असणाऱ्या रस्त्याचा आजू बाजूला असणाऱ्या प्लॅस्टिकच्या बाटल्या, इतर प्लॅस्टिकचा कचरा गोळा करण्यास सुरुवात करून किल्ल्यावर मार्गक्रमण करताना चार पाच लोकांचे असे आठ गट करून साफसफाई व प्लॅस्टिक गोळा करत पवित्र अशा रायरेश्वर मंदिरात जाऊन सर्वजणांनी दर्शन घेतले. यावेळी स्थानिक सखाराम जंगम यांनी किल्ला व परिसरातील ठिकाणची माहिती दिली.

या मोहिमेत एकूण 11 पोती प्लॅस्टिक, अविघटनशिल कचरा गोळा करून तो वनविभागच्या ताब्यात पुढील विल्हेवाट लावण्यासाठी देण्यात आला. नंतर निसर्गाची अमूल्य देणगी असलेल्या या सह्याद्रीच्या कुशीत वसलेले अनेक किल्ले आणि निसर्गरम्य देखावे, नीरा देवधर धरण, पांडवांनी काही दिवस वास्तव्य केलेल्या गुहा इ. ठिकाणे पाहत स्वच्छता केली. येथील शेतकरी करत असलेल्या शेतीची पाहणी केली.

वनविभागाचे परिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय मिसाळ, वनपाल कल्पना पाटील, हुकिरे अनंत, सुधीर पोळ, पी.एल. वाघमारे, सुरेश काळे, पुनम कवडे, होनराव, बगाडे, डाखोरे, ढोले असे वनविभागाचे सर्वच सहकारी सहभागी झाले होते.

Bh

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.