Bhor Crime News : दोन सराईत गुन्हेगारांकडून 3 पिस्टल, 3 काडतुसे जप्त

एमपीसीन्यूज : राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पुणे ग्रामीण पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करीत त्यांच्या ताब्यातून 3 गावठी पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे असा 1 लाख 13 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दीपक उर्फ भैय्याजी धनाजी जगताप (वय, २६ रा. रांझे, ता.भोर, जि. पुणे) आणि सागर संजय सुरडकर (वय २२, रा.अष्टविनायक चौक, मोरे वस्ती, ता.हवेली, जि.पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक राजगड पोलिस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना रांझे फाट्यावर दोन संशयित इसम दिसले. पोलिसांनी त्यांना विचारपूस करण्यासाठी थांबविण्याचा प्रयत्न केला असता ते पळून जाऊ लागले.

त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून या दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता तीन गावठी पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे आढळून आली.

दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. राजगड पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.