Bhor : विकसित भारत संकल्प यात्रा महत्वपूर्ण : आमदार शिरोळे

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकसित भारत संकल्प यात्रा (Bhor)महत्वपूर्ण असल्याचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी यांनी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ अंमलबजावणीचा आढावा आज व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे घेतला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भोर तालुक्यातील राजापूर ग्रामपंचायत येथे लाभार्थी व नागरिकांशी सवांद साधला.

विकसित भारत संकल्प यात्रेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद (Bhor)मिळत असून याअंतर्गत आजपर्यंत 152 ग्रामपंचायतीत घेतलेल्या कार्यक्रमात 81 हजार 684 नागरिकांनी सहभाग घेतला आहे.

Akurdi : युवा सेनेचा उद्या आकुर्डीत मेळावा

23 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याहस्ते एलईडी चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.या रथाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती चित्रफिती आणि हस्तपत्रकांच्या माध्यमातून देण्यात येत आहे. नागरिकांशी संवाद साधून लाभार्थ्यांची नोंदणीदेखील करून घेण्यात येत आहे.

केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या या यात्रेदरम्यान कार्यक्रम झालेल्या गावांमध्ये ३२ आयुष्मान कार्ड, २५ भूमी अभिलेख दाखले, ‘हर घर जल’ च्या 24 जोडण्या देण्यात आल्या. याशिवाय ५७ ओडीएफ शौचालय योजनेचा लाभ देण्यात आला.
यात्रेदरम्यान 74 किसान क्रेडिट कार्ड आणि 31मृदा आरोग्य कार्ड वितरीत करण्यात आले.

संबंधित गावांमधील 1 हजार 420 खेळाडू, 4 हजार 679विद्यार्थी, 1हजार 54स्थानिक कलाकार आणि 11हजार 938महिलांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलावडे यांनी कळविले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.