Bhor : भोर तालुक्यातील 45 गावांत नागरिकांना मोफत काशी विश्वनाथ यात्रेचे पास वाटप

एमपीसी न्यूज – भाजपा जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे (Bhor) यांच्या हस्ते भोर तालुक्यातील 45 गावांतील नागरिकांना भाजपचे माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत काशी विश्वनाथ यात्रा क्र. 3 चे पास वाटप करण्यात आले. तसेच भाऊबीज निमित्त आलेल्या प्रत्येक बहिणीस यावेळी साडी भेट म्हणून देण्यात आली.

या यात्रेसाठी मुळशी तालुक्यातील नागरिकांना देखील लवकरच पास वाटप करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे आत्तापर्यंत सुमारे 6000 नागरिकांना सुखरूप आणि अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने काशी विश्वनाथांचे दर्शन घडविले आहे, अशी माहिती किरण दगडे पाटील यांनी दिली. या टप्प्यातील काशी यात्रेचे नियोजन हे महाशिवरात्रीच्या पुण्य मुहूर्तावर करण्यात येणार असून दि. 09 मार्च रोजी या यात्रेसाठी रवाना होणार असल्याची माहिती यावेळी नागरिकांना दिली.

PCMC : महापालिका अर्धवेळ 65 तज्ज्ञ डॉक्टर घेणार

तसेच यात्रेच्या नियोजनाबाबत सर्व तयारी करण्यावर सध्या काम सुरू असल्याचे देखील उपस्थितांना सांगितले. दरम्यान प्रत्येक नागरिकाला काशी विश्वनाथ यात्रेला घेऊन (Bhor) जाण्याचे आश्वासन ही यावेळी दिले.

याप्रसंगी भाजपाचे बारामती लोकसभा प्रभारी नवनाथ पडळकर, बारामती लोकसभा सहप्रभारी जालिंदर भाऊ कामठे, भाजपा पुणे सरचिटणीस शेखरभाऊ वढणे, सरचिटणीस वैशालीताई सणस, पुणे जिल्हा उपाध्यक्ष गिरीश जगताप, चिटणीस सचिन मांडके, जिल्हा उपाध्यक्ष विनायक ठोंबरे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गरुड, भोर तालुका अध्यक्ष जीवन कोंडे, मुळशी तालुका अध्यक्ष राजाभाऊ वाघ, वेल्हे तालुका अध्यक्ष आण्णा देशमाने, भोर शहर अध्यक्ष सचिन कण्हेरकर, युवा मोर्चा अध्यक्ष अमर बुदगुडे, शारदाताई चोबे, पल्लवीताई फडणवीस, लताताई अंबडकर, वैशालीताई बांदल, स्वातीताई पुष्पतोडे, सुषमाताई जागडे, सरपंच देविदास हनमघर, डॉ. नागेंद्र चोबे, राजेंद्र मोरे, राजाभाऊ गुरव, संतोष लोहकरे, सुधीर कदम, सुनिल पांगारे, निलेश कोंडे, राजेंद्र निगडे, राहुल धावले आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.