Bhor News: अंगावर वीज पडल्याने भोरमध्ये रुग्णवाहिका चालकाचा दुर्दैवी मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे शहर आणि ग्रामीण भागात आज (शनिवारी) सायंकाळी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. या पावसात भोर तालुक्यातील भोंगवली गावात वीज अंगावर पडल्याने विकास चंद्रकांत शिंदे (वय 30) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

विकास शिंदे हे भोंगवली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिका चालक म्हणून काम करत होते.

आज सायंकाळी भोर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. विकास शिंदे हे पत्नीसह गावी जात असताना भोंगवली गावच्या हद्दीत पाऊस लागल्याने ते एका वीट भट्टीजवळ थांबले होते. ते ज्या ठिकाणी थांबले होते तेथेच जोराची वीज पडली. यामध्ये विकास शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला.

विकास शिंदे यांच्यामागे पत्नी व दोन मुले आहेत.

रुग्णवाहिका चालकाचा रूपात त्यांनी अनेक रुग्णांना जीवदान दिले. रात्री-अपरात्री रुग्ण आणि धिकारी कर्मचार्‍यांच्या मदतीला धावून जाणारा शांत आणि सुस्वभावी अशी विकास शिंदे यांची ओळख होती. तालुक्याच्या आरोग्य विभागात या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.