Bhosale Pride : ‘भोसले प्राईड’मध्ये गणेशोत्सवानिमित्त खास ऑफर, फ्लॅट बुकिंगवर स्टॅम्प ड्यूटी आणि नोंदणी शुल्क माफ

एमपीसी न्यूज – मॉडर्न लाईफस्टाईलला केंद्रस्थानी ठेवून मोशीच्या सुंदर परिसरात ‘भोसले प्राईड’ (Bhosale Pride) हा अतिशय विलोभनीय गृहप्रकल्प साकारला आहे. भोसले असोसिएट्सच्या गणेश भोसले यांनी  अद्ययावत सोयींनी सुसज्ज हा नवा प्रकल्प उभारला आहे. नुकतेच या गृहप्रकल्पातील ‘ए’ बिल्डींगचे काम  वेळात पूर्ण करून ग्राहकांना त्याचा ताबा देण्यात आला. याच गृहप्रकल्पातील ‘बी’ बिल्डींगचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या इमारतीचे नवव्या मजल्यापर्यंत बांधकाम पूर्ण झाले आहे. 

गणेशोत्सवानिमित्त ‘भोसले प्राईड’मध्ये (Bhosale Pride) खास ऑफर देण्यात आली असून, पहिल्या दहा ग्राहकांच्या फ्लॅट बुकिंगवर स्टॅम्प  ड्यूटी आणि नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही.  ऑफर  मर्यादीत असून, प्रथम येणा-या ग्राहकांसाठीच ही ऑफर असणार आहे.

शांत, स्वछ परिसर तसेच पिंपरी-चिंचवड, भोसरी, चाकण आणि मरकळ या औद्योगिक केंद्रांपासून अगदी जवळ असणारा हा गृहप्रकल्प सर्वांच्याच पसंतीला उतरत आहे. पुणे- नाशिक महामार्गाच्या दुतर्फा झपाट्याने विकसित होत असलेल्या भागातील ‘भोसले प्राईड’ हा गृहप्रकल्प सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हिंजवडी व तळवडे आयटी पार्कपासून हा गृहप्रकल्प फक्त 10 ते 20 मिनिटांच्या अंतरावर आहे. लोहगाव विमानतळ, आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र व नियोजित सफारी पार्कपासून हा प्रकल्प अगदी जवळ आहे.

हा परिसर अत्यंत झपाट्याने विकसित होत असल्याने ‘भोसले प्राईड’ मध्ये (Bhosale Pride) घर घेणं म्हणजे भविष्याचा वेध घेत केलेली सर्वांत चांगली गुंतवणूक ठरणार आहे. एकूण 142 सदनिकांचा हा प्रकल्प असून पहिल्या टप्प्यातील 71 सदनिकांचे बांधकाम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्यातील 71 सदनिकांचे काम प्रगतीपथावर आहे. पहिल्या टप्प्यातील फ्लॅटचे ‘रेडी पझेशन’ असून बहुतांश फ्लॅटचे बुकिंग झाले आहे. ‘रेडी पझेशन’चे काही फ्लॅट अजून शिल्लक असून त्याचा लाभ ग्राहकांना मिळू शकतो.

Maharashtra Ministers Portfolio : राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, फडणवीसांकडे गृह,अर्थमंत्रालयाची जबाबदारी

दुसऱ्या टप्प्यातील फ्लॅटच्या बुकिंगलाही ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. बी ईमारतीमधील  27 फ्लॅट विकले गेले आहेत. उर्वरित फ्लॅटसाठी ग्राहकांना गणेश उत्सवानिमित्त देण्यात आलेल्या खास ऑफरचा लाभ घेता येईल. असे गणेश भोसले यांनी सांगितले.

प्रत्येक दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था

शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, अद्ययावत रुग्णालये, शॉपिंग मॉल, उत्तम रस्ते अशा पायाभूत सुविधांबरोबर उत्कृष्ट सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील उपलब्ध असल्याने हा परिसर निवासासाठी सर्वाधिक पसंतीचा ठरत आहे. प्रत्येक दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था, हवेशीर व  हिरवेगार आल्हाददायक वातावरण, मुलांना खेळण्यासाठी गार्डन तसेच सामायिक जागेत लाईट बॅकअप या सुविधा आपण उपलब्ध करून दिल्या आहेत. मॉडर्न लाईफस्टाईचा परिपूर्ण आनंद घेण्यासाठी ‘भोसले प्राईड’ (Bhosale Pride) नक्कीच एक स्मार्ट चॉईस ठरू शकते.

पत्ता : भोसले प्राईड, गट क्र. 515,  गणपती मंदिरासमोर, 

बोऱ्हाडे वस्ती, पुणे-नाशिक महामार्ग, मोशी, पुणे – 412 105

संपर्क : 7066031031/  9689730808/  

ई-मेल : [email protected]

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.