Bhosari : घरासमोर गोंधळ घालणाऱ्या मुलांना ओरडल्याने एकाला मारहाण

एमपीसी न्यूज – घरासमोर गोंधळ घालणाऱ्या मुलांना ओरडल्याच्या कारणावरून एकाला लाकडी फळीने मारहाण करून जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. 4) रात्री बालाजीनगर, भोसरी येथे घडली.

याबाबत  अलका रमेश कोटकर (वय 45) यांनी सोमवारी (दि. 6) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लता काकडे आणि जहांगीर (पूर्ण नाव माहिती नाही. सर्व रा. बालाजीनगर, भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास फिर्यादी यांच्या घरासमोर लहान मुले गोंधळ घालत होती. यामुळे फिर्यादी अलका यांचे पती रमेश कोटकर हे मुलांना ओरडले. या कारणावरून चिडलेल्या आरोपींनी आपसांत संगनमत करून रमेश यांना लाकडी फळीने मारले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. तसेच आरोपींना त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.