Bhosari : शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दीड लाखांची मदत

एमपीसी न्यूज – भोसरी येथील शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख 51 हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे.

मागील दोन महिन्यांपासून राज्यासह देशात कोरोना विषाणूचे संक्रमण होत आहे. दिवसेंदिवस ही स्थिती वाढत आहे. महाराष्ट्रात याचा सर्वाधिक प्रसार झाला आहे. राज्य सरकार सर्व पातळ्यांवर विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहे. वैद्यकीय, प्रशासकीय, पोलीस कोरोनाच्या विरोधात लढत आहेत.

संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केल्याने सर्व कारखाने, कंपन्या आणि आर्थिक व्यवहार शून्यावर आले आहेत. राज्याच्या तिजोरीवर याचा परिणाम झाला आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी देण्यासाठी राज्यातील जनतेला आवाहन केले आहे.

शिवनेर नागरी सहकारी पतसंस्था ही सामाजिक बांधिलकी जपत आहे. वर्षभर पतसंस्थेच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेने मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला साद देत एक लाख 51 हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. ही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड 19 या खात्यात जमा करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.